आंबेगाव: भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध
Ambegaon, Pune | Nov 11, 2025 भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना आता सवय झाली सोसायटी काढायची ती थकवायची व नंतर कर्जमाफी मागायची असे व्यक्तव्य केले होते. या वक्तव्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून त्यांनी शेतकऱ्यांविषयी असे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही असे सांगितले.