पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली वनपरिक्षेत्रात वर्षाच्या अखेरच्या दिवशी बुधवार दिनांक 31 डिसेंबरला जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना या वनपरिक्षेत्रातील प्रमुख वाघ टी-98 आणि टी -108 वाघाचे दर्शन झाल्याने पर्यटक सुखावले आहेत. वाघाच्या नियमित दर्शनासाठी प्रसिद्ध असलेले चोरबाहुली जंगल सफारीद्वार 31 डिसेंबरला पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. टी -108 वाघाने आज सांबाराची शिकार केल्यानंतर भक्ष खातांनाचे दृश्य पर्यटकांना प्रत्यक्ष पाहता आले.