शिरपूर: ब्रेक फेल झाल्याने बिजासन घाटात कंटेनर उलटला; चालकाचा जीव थोडक्यात वाचला
Shirpur, Dhule | Sep 19, 2025 मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर जवळ कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने 20 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघातग्रस्त झाल्याची घटना 19सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे.तालुक्यातील बिजासन घाट परिसरात बिजासन शिवारात UK-08CB- 1949 क्रमांकाचा कंटेनरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला.तो हरिद्वारहून मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाने मुंबईकडे पतंजली कंपनीचे प्रॉडक्ट घेऊन जात होता.चालक सुखरूप असून तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.