आज दिनांक 21 डिसेंबरला नगरपरिषद साठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली.सकाळी दहा वाजता पासूनच मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती.परंतु यवतमाळ नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे चित्र सायंकाळी स्पष्ट झाले. भाजपाचे उमेदवार प्रियदर्शनी उईके व काँग्रेसच्या प्रियंका मोघे यांच्यात थेट लढत झाली.अखेर भाजपाचे उमेदवार प्रियदर्शनी उईके यांनी बाजी मारून नगराध्यक्ष पदाची माळ गळ्यामध्ये घातली.प्रियदर्शनी उईके यांनी तब्बल 12 हजारापेक्षा जास्त मतांनी विजय संपादन केला.