जुन्नर: नाणेघाट लेणी प्रतिबंध क्षेत्रात बांधकाम; एकावर गुन्हा
Junnar, Pune | Oct 20, 2025 घाटघर (ता. जुन्नर) जवळील नाणेघाट लेणीचे प्रतिबंध क्षेत्राच्या हद्दीत बांधकाम करणाऱ्या दोघांविरुद्ध प्राचीन स्मारके व पुराण जागा व अवशेष अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.यमुनाबाई किसन रावते (रा. घाटघर, ता. जुन्नर), गणेश बबन सांगडे (रा. धालेवाडी तर्फे मिन्हेर ता.जुन्नर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.