केळापूर: शिक्षक द्या आम्हाला शिकायचे आहे,विद्यार्थ्यांची मागणी पांढरकवडा पंचायत समिती कार्यालयात भरवली शाळा
पांढरकवडा तालुक्यातील चनाखा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांची तीव्र कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून या प्रश्नाविरोधात विद्यार्थ्यांसह पालकांनी पंचायत समिती पांढरकवडा येथे ठिय्या आंदोलन केले असल्याची माहिती आज दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळला पालकांनी दिली आहे.