बुलढाणा: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळालीच पाहिजे,शिवसेना उबाठाने तहसीलदाराला दिले निवेदन
मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी व धामणगांव बढे या सर्कल मध्ये परवा रात्री झालेल्या ढगफुटी सदृष्ट पाऊसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनाम करुन शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यात यावी,अशी मागणी आज 3 नोव्हेंबर रोजी दुपारी शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात मोताळा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.