शिरपूर: शहरातील बोहरा मशीद जवळ टेलरच्या दुकानाला भीषण आग,लाखोंच्या नुकसानीसह दुकान जळून खाक,शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय
Shirpur, Dhule | Nov 9, 2025 शिरपूर शहरातील बोहरा मशिदीच्या मागील बाजूस असलेल्या 'नाईन टेलर्स' नावाच्या दुकानाला 9 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.या आगीत ग्राहकांनी शिवणकामासाठी दिलेले कपडे, शिलाई मशिन्स, फर्निचर आणि इतर मौल्यवान साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.