बुलढाणा शहरातील आठवडी बाजारातून २३ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आयेशा अकबर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.