राहुरी: खुडसरगाव शिवारात पिकामधे तळ्याचे स्वरूप शेतकऱ्यांनी पाण्यात पोहून थेट मुख्यमंत्र्यांकडे केली मदतीची मागणी
राहुरी तालुक्यामध्ये गेल्या चार दिवसापासून सततच्या झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्व भागात तर शेती पिकातच तळ्यांचे स्वरूप आल्याने खुडसरगाव येथील हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी या पाण्यामध्ये पोहून आपला रोष व्यक्त करत थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून मदत करण्याची मागणी केली.