मंगळवेढा: दामाजी कारखाना सभासदांच्या मालकीचा राहील या उद्दिष्टाने काम सुरू : दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील
मंगळवेढा तालुक्यातील दामाजी कारखाना सभासदांच्या मालकीचा राहील, या उद्दिष्टाने संचालक मंडळाचे काम सुरू असल्याचे प्रतिक्रिया दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. ते आज सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, दामाजी कारखान्याचा अनाठाई खर्च बंद करण्यात आला असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.