नांदुरा: सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या; क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी
नांदुरा तालुक्यात खरीप हंगाम 2025–26 मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सोयाबीन पिकांचा पेरा शेतकऱ्यांनी केला आहे. परंतु यावर हुमणी अळी, येलो मोजॅक, निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे; तरी शासनाने कोणतेही पंचनामे व सर्वे न करता नांदुरा तालुक्यातील सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाई ही १५ दिवसाच्या आत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.