शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन लहान मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी जालन्यातील तब्बल 25 विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी एकत्र येत मुका निषेध नोंदवून पोलीस अधीक्षकांना ठराव सादर केला. शनिवार दि. 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज चौकात चिमुकल्यांच्या संरक्षणार्थ आपण पावले उचलणार आहात का नाही, असा संतप्त प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.