विक्रमगड: वलसाड फास्ट पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला केळवे रोड स्थानकात लागली आग
वलसाड फास्ट पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड स्थानकात वलसाड फास्ट पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला अचानक आग लागली. रेल्वे ट्रेनच्या इंजिनला आग लागल्यामुळे पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वे सेवा व लांब पल्ल्यांच्या गाड्या प्रभावीत झाल्या आहेत. गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्या वसई, विरार आणि इतर स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.