धुळे जिल्हा सह सोनगीर परिसरात मक्याचे भाव कोसळल्याने हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने मक्यासाठी २४०० प्रति क्विंटलचा हमीभाव जाहीर केला असताना, बाजारात व्यापाऱ्यांकडून केवळ १२०० ते १३०० इतकाच दर मिळत आहे. नांगरणीपासून कापणीपर्यंतचा प्रचंड खर्च आणि मेहनत वाया जात असल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.