सावरटोला येथे जय बजरंग मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील तरुणांना आपली कला दाखविण्याची संधी मिळते असे याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर म्हणाले. यावेळी जय बजरंग मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयोजकांना शुभेच्छा दिल्या.