धारणी पोलीस स्टेशन हद्दीतील खापरखेडा येथे हुंडाबळी झाल्याची तक्रार एका महिलेने 26 डिसेंबरला दुपारी दोन वाजून 31 मिनिटांनी धारणी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार हुंडाबळी प्रकरणातील मृतक महिला ही सात महिन्याची गर्भवती असल्याने तिला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे दाखल करण्यात आले होते. तिथून तिला जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती येथे दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय अमरावती येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असल्याने, मृतकाच्या नातेवाईकांनी.....