मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अनुदान वाटपात अन्याय झाला असा आरोप करत वैजापूर तहसील कार्यालय समोर सोमवारी शेतकरी संघटनेकडून उपोषण सुरू करण्यात आले.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून शासनाकडून अनुदान वाटप करण्यात आले मात्र सदरील नुकसान भरपाईचे पंचनामे महसूल व कृषी प्रशासनाकडून घरबसल्या करण्यात आले एवढेच नव्हे तर सरसकट क्षेत्र हे कोरडवाहू टाकण्यात आले ज्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला.