कुही: तारणा येथे लोक कलावंत मेळाव्याचे आयोजन करून जनजागृती
Kuhi, Nagpur | Oct 19, 2025 ग्रामीण भागात असलेल्या मौजा तारणा येथे ओमदेवी युवक मंडळ व वैष्णोदेवी महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोककलावंत मेळाव्याचे आयोजन जनजागृती करण्यात आली. सदर लोक कलावंत मेळाव्याचे उद्घाटन सरपंच पराग तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप कूलरकर,आकाश राऊत, कृष्णा चक्रधर, बंडू चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोककलावंत यांनी हजेरी लावून हुंडाबळी, दारूबंदी, व्यसनमुक्ती आदींबाबत जनजागृती करण्यात आली.