कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील एमआयडीसी परिसरात दुचाकीचा अपघात
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील काटोल–नागपूर बायपास एमआयडीसी परिसरात झालेल्या अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेशभाऊ गमे यांनी आपल्या टीमसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.अपघातग्रस्ताला तातडीने ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे उपचाराकरिता पोहोचवण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी जखमी व्यक्तीस नागपूर मेडिकल कॉलेज येथे हलवण्यात आले.