चिखली: आ.श्वेता ताई महाले पाटील यांनी दिली चिखली येथील दीपावली बाजाराला भेट
आ.श्वेता ताई महाले पाटील यांनी दिली चिखली येथील दीपावली बाजाराला भेट,ही भेट केवळ बाजारातली नव्हती ही भेट होती आपल्या लोकांची, त्यांच्या जीवनाशी थेट संवाद साधणारी दिवाळी फक्त दिव्यांनी नव्हे, माणुसकीच्या प्रकाशाने उजळते, हे पुन्हा एकदा जाणवले. शुभेच्छा अशा प्रत्येक हाताला.ज्यांच्या कष्टांतून आपली दिवाळी सजते! अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यावेळी आमदार महाले यांनी व्यक्त केल्या.