राहुरी शहरातील नगर–मनमाड रस्त्यावरील प्रभाग क्रमांक ९ मधील सांडपाणी वाहतुकीचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निकृष्ट व अरुंद सिमेंट पाईप टाकल्यामुळे पावसाळ्यात परिसर जलमय होत असल्याने नगरसेवक प्रशांत डौले यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलन केले होते.आंदोलनाची दखल घेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळी पाहणी करून मोठ्या क्षमतेची व दर्जेदार भूमिगत पाईपलाईन टाकण्याचे संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना निर्देश दिले.