तालूक्यातील शिरपूर शेतशिवारात असलेल्या शेततळ्यात आंघोळीचा बेत जीवावर बेतत दोन सख्खे मावस भावाचा पाण्यात बूडत मृत्यु झाल्याची घटणा आज दि.६ जूलै रविवार रोजी सकाळी १० वाजेचा सूमारास घडली. विहान ज्ञानेश्वर मडावी वय १२ वर्ष रा.शिरपूर व रूदय ज्ञानेश्वर मडावी वय ९ वर्ष रा.कूरखेडा (चातगांव) ता.धानोरा हल्ली मु.गडचिरोली असे मृतक मावस भावांचे नावे आहेत मृतक आज सूट्टीचा दिवस असल्याने सायकलने गावा शेजारी असलेल्या शेततळ्याकडे गेले होते.