आज सोमवार दिनांक 22 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील मुरमी गावात शुक्रवारी एका १७ वर्षांच्या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तरुणीला घरात एकटं पाहून आतमध्ये घुसलेल्या आरोपीनं तिचा गळा चिरून खून केला होता. सुरुवातीला हा खून आहे की आत्महत्या? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी याबाबत सखोल तपास केला असता हा खून एकतर्फी प्रेमातून झाल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.