मुलींना भविष्यात होणार्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी एचपीव्ही लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी शुक्रवार दि.13 मार्च 2026 रोजी दुपारी 3 जवाता केले आहे. जालना जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील 14 वर्षे पूर्ण व 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना ही लस देण्यात येत आहे.या लसीमुळे मुलींना भविष्यात होणार्या गर्भाशयाच्या कर्करोगापासून सुरक्षा होईल.