बुलढाणा: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम आरक्षण अधिसूचना ३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केली आहे.ही अधिसूचना जिल्हा परिषद कार्यालय, सर्व तहसील कार्यालये तसेच पंचायत समिती कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता प्राप्त झाली आहे.