अमरावती: अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश
*अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश..* *आ.संजय खोडके व आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या कार्याने प्रभावित होऊन दर्शविली राष्ट्रवादीला साथ.*. अमरावती महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक,महासचिव - आमदार संजय खोडके व अमरावतीच्या आमदार -सौ.सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वावर व कुशल कार्यशैलीवर विश्वास दर्शवून अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होत आहे.