उदगीर नांदेड रोडवर मध्यभागी मोठं मोठे खड्डे पडल्यामुळे नेहमी छोटे मोठे अपघात होत होते,त्याच बरोबर वाहनधारकांना या खड्ड्याचा सामना करावा लागत होता,नांदेड उदगीर रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहनधारकांना व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी मागील आठवड्यात बहुजन विकास अभियानाने केली होती, अखेर बहुजन विकास अभियानाच्या मागणीची दखल घेत १७ डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे