रेणापूर: तहसील कार्यालयाला पुराचा फटका..नागरिकांचे जन्म-मृत्यूचे दाखले पाण्यात! कार्यालय दोन फुट पाण्यात
Renapur, Latur | Sep 29, 2025 लातूर जिल्ह्यातील रेणापूर तहसील कार्यालयाला पुराचा मोठा फटका बसला आहे. कार्यालयाच्या तळमजल्यावर सुमारे दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते. यामुळे तळमजल्यावरील सेतू सुविधा केंद्रातील नागरिकांनी प्रमाणपत्रांसाठी जमा केलेले अर्ज आणि अनेक सरकारी दस्तावेजांचे गठ्ठे पूर्णपणे भिजून मोठे नुकसान झाले आहे.