रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक आणि तितकीच हृदयद्रावक घटना लाखनी तालुक्यातील मानेगाव (सडक) शेतशिवारात उघडकीस आली आहे. अवघ्या १० दिवसांच्या एका निरागस चिमुरडीला तिच्या जन्मदात्यांनी एका काळ्या रंगाच्या बॅगेत भरून नाल्यात फेकून दिल्याची घटना समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवार, १३ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास मानेगाव शिवारातील नाल्यातून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने खळबळ उडाली.