कन्नड: विटा शिवारात बिबट्याने शेळीच्या पिल्लाचा पाडला फडशा
आज दि १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता माध्यमांना माहिती मिळाली कि कन्नड तालुक्यातील विटा येथे शेतकरी शिवाजी राजू शिंदे यांच्या शेतात बिबट्याने दोन शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका शेळीच्या पिल्लाचा मृत्यू झाला, तर दुसरी शेळी गंभीर जखमी झाली. शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शिंदे यांनी शेडकडे धावताच बिबट्या पिल्लाला तोंडात धरून नेताना दिसला. माहिती मिळताच वनपाल संजय काझी आणि वनरक्षक अजिनाथ नागरगोजे घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून शवविच्छेदनानंतर बिबट्यानेच हल्ला केला.