मेहकर: शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात यांची जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट,महिला आरोग्य शिबिराची पाहणी
मेहकर तालुक्यातील जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात "स्वस्थ नारी – सशक्त परिवार" अभियानांतर्गत 19 सप्टेंबर रोजी महिला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी व तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत तब्बल 670 महिलांनी आरोग्य तपासणी व उपचार घेतले.