चंद्रपूर: दोन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या वाघासह २४ तासांत पाच वाघ जेरबंद, वनविभागाची यशस्वी कारवाई
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर आणि शिवरा येथील दोन शेतकऱ्यांचा बळी घेणारा वाघ अखेर वनविभागाच्या हाती लागला आहे. सोमवारी रात्री आठ वाजता डोमा बीट परिसरात वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. सावली वनपरिक्षेत्रातही डोनाळा व गवारला परिसरात धुमाकूळ घालणारी एक वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांना गेल्या २४ तासांत जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. वनविभागाच्या पथकाने प्रथमच २४ तासांत पाच वाघांना जेरबंद केले आहे.