सेलू: नानबर्डी येथे घरातून रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले, अज्ञात आरोपीविरुद्ध सेलू पोलिसांत गुन्हा नोंद
Seloo, Wardha | Nov 5, 2025 अज्ञात चोरट्याने घरातील डब्ब्यातून रोख रक्कम व सोन्याची एकदानी चोरून नेली. ही घटना ता. ३ ला सेलू नजीकच्या नानबर्डी येथे दुपारी ४.३० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रवींद्र नागोसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती ता. ५ बुधवारला सेलू पोलिसांनी दिली.