नाशिकरोडमधील मंजुळा मंगल कार्यालया नजिक असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएम केबिनमध्ये अज्ञात चोरट्याने एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदली करत दोन खात्यातून ६६ हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. योगेश जयंतराव शेळके (67, रा. मॉडेल कॉलनी, आत्मजा सोसायटी, जेलरोड, नाशिकरोड) हे १७ डिसेंबरला सकाळी मंजुळा मंगल कार्यालय परिसरातील असलेल्या मेट्रो सायकल नजिकच्या एसबीआय बँकेचे एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले.