घरफोडी करून चोरी करणारा चोरटा जेरबंद;स्वराज्य नगरमध्ये फोडले होते घर
बीड शहरातील स्वराज्यनगर परिसरात झालेल्या घरफोडीतील चोरटा केवळ १२ तासांत पोलिसांच्या ताब्यात आला आहे. अशी माहिती शिवाजी नगर पोलिसांनी बुधवार दि.8 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 :30 वाजता प्रसार माध्यमांना दिली.आकाश नवनाथ कातांगडे यांच्या घरात 6 ऑक्टोबरच्या मध्यरात्री चोरी झाली होती. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी प्रथमेश किसन जाधव, वय २०, रा. पंचशीलनगर बीड, यास अटक केली आहे.