बुलढाणा: खोटे काम करणाऱ्या सेतु केंद्र चालका विरुद्ध गुन्हा दाखल करणार, जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिले आदेश
बुलडाणा तालुक्यातील माळविहीर येथील गणेश श्रीकृष्ण गुंडकर या सेतू केंद्र चालकाने नायब तहसीलदाराची खोटी सही व बनावट बनावट शिक्का वापरून भाडेपट्टा तयार करून दिल्याची गंभीर बाब उघडकीस आल्यावर बुलढाणा एसडीओ शरद पाटील यांनी सदर सेतू केंद्र कायमचा रद्द केला आहे.सदर केंद्र चालका विरुद्ध गुन्हा दाखल करणार,अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.