चिखली: वडाळी येथील माजी सैनिकाचा विद्युत शॉक लागून मृत्यू
वडाळी येथील माजी सैनिकाचा विद्युत शॉक लागून मृत्यू मेहकर तालुक्यामधील वडाळी येथील माजी सैनिक विठ्ठल पांडुरंग जटाळे अंदाजे वय ५१ वर्ष यांचा स्वतःच्या शेतामध्ये इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याने वडाळी व परिसरातील हळहळ व्यक्त केली जात आहे. विठ्ठल जटाळे यांनी देशाची सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर काळ्या मातीची सेवा करण्यासाठी शेती करत होते.वडाळी व परिसरात त्यांच्या देश सेवेच्या कर्तव्याची दखल घेऊन वडाळी व परिसरात नवयुवक सैन्य भरती मध्ये भरती होण्यासाठी कसरत करत आहे.