हिंगोली: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आरोग्य सेवांचा आढावा
हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांची आढावा बैठक घेतली. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत निर्धारित केलेल्या निर्देशांकाची पूर्तता करून आरोग्य संस्था एनकॉस प्रमाणित कराव्यात. अशा सूचनाही त्यांनी दिले आहे.