लोणार: दादुलगव्हाण येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
Lonar, Buldhana | Sep 18, 2025 लोणार तालुक्यातील सुलतानपूर वीज वितरण केंद्रांतर्गत चिंचोली (एजी) फीडरशी संलग्न असलेल्या दादुलगव्हाण येथील अल्पभूधारक शेतकरी रामभाऊ कोंडू पनाड हे १४ सप्टेंबर रोजी शेतात काम करण्यासाठी गेले होते. शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा शॉक बसला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी पंचनामा करून मृत्यूची मृत्यूची नोंद केल्याची माहिती १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.