नरखेड: रमना नगर येथे सेवा पंधरवाडा अंतर्गत सामाजिक उपक्रमाचे आयोजन
Narkhed, Nagpur | Sep 28, 2025 देशाचे यशस्वी व दूरदृष्टी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर "सेवा पंधरवडा" या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, जनजागृती आणि विकासात्मक कार्यांना चालना देणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे.या अभियानाचा एक भाग म्हणून आज नरखेड रमना नगर येथे लहान मुलांना बुक आणि पेन वाटप करण्यात आले .