तालुक्यात व शहरात श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सकाळपासून तर दिवसभरच करण्यात आले. गाडगेबाबा मार्केट व्यापारी संघटना चांदुर रेल्वे द्वारे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात आले .गाडगेबाबा मार्केटची सामूहिकरीत्या साफसफाई, रक्तदान शिबिर, गाडगेबाबांच्या फोटोचे पूजन व गरजूंना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले .तसेच तालुक्यात सुद्धा विविध ठिकाणी पूजन करून ग्रामस्वच्छता करण्यात आली.