धरणगाव तालुक्यातील भोकणी गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि आयशर यांच्यात झालेल्या अपघातात परप्रांतीय ट्रकचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली होती. या संदर्भात मंगळवारी २ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.