दिनांक 20 नोव्हेंबर ची दुपारी 3 वाजेच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते अनिल राऊत यांनी वार्ड क्रमांक 9 येथे भरलेले नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय कोठेवार, नितीन बारेवार, वामन वरवाडे यांच्या उपस्थितीमध्ये मागे घेतले. सामाजिक कार्यकर्ते अनिल राऊत यांऊ उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी अनिल राऊत यांनी भाजपला समर्थन दिल्याने निश्चितच गोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.