त्र्यंबकेश्वर: त्र्यंबक पत्रकार हल्लाप्रकरणी खा. वाजे यांचे उपस्थितीत शिवसेना उबाठा गटाचे नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन
त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उबाठा गटाच्या वतीने खा. राजाभाऊ वाजे यांचे उपस्थितीत नाशिक येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.