धुळे: जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबरला 'सार्वजनिक सुटी'; बँकांसह सरकारी कार्यालये राहणार बंद
Dhule, Dhule | Nov 30, 2025 धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, शिरपूर-वरवाडे, दोंडाईचा-वरवाडे, पिंपळनेर नगरपरिषद आणि शिंदखेडा नगरपंचायती क्षेत्रात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा सरकारी कामगार अधिकारी मधुरा सूर्यवंशी यांनी सांगितले की, ही सुटी स्थानिक कार्यालयांप्रमाणेच बाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही लागू राहील. या दिवशी शासन कार्यालये, निमशासकीय संस्था, बँका आणि सार्वजनिक उपक्रम बंद राहतील.