नाशिक: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल! गजराने नाशिक दुमदुमले
Nashik, Nashik | Nov 2, 2025 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग, पंढरीनाथ भगवान की जय" अशा जयघोषात आजचा दिवस नाशिककरांसाठी भक्तिमय वातावरणात उजाडला. कार्तिकी एकादशी निमित्ताने शहरातील आणि उपनगरातील विठ्ठल मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.