धुळे महापालिका निवडणूक जाहीर होताच भाजपने ५५ हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. आमदार अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांची बैठक झाली. अग्रवाल यांनी विकासकामांच्या जोरावर जनतेसमोर जाण्याचे आवाहन केले. व्यक्तीपेक्षा पक्षाला प्राधान्य द्यावे व आपल्या कुटुंबातून उमेदवार नसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत डॉ. सुभाष भामरे, राजवर्धन कदमबांडे व गजेंद्र अंपळकर यांनीही मार्गदर्शन केले.