चामोर्शी: साईबाबांच्या 'मूळ चर्मपादुका '१४ आक्टोंबरला गडचिरोलीत
गडचिरोली: शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबांच्या ‘मूळ चर्मपादुका’ दुसऱ्यांदा गडचिरोली शहरात दर्शनासाठी येत आहेत. मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी या पवित्र पादुकांचे गडचिरोलीत आगमन होणार आहे. यानिमित्त साई मंदिर, चामोर्शी रोड येथे एक नियोजन बैठक पार पडली, ज्यात संस्था प्रतिनिधी आणि साईभक्त उपस्थित होते.या बैठकीत पादुका आगमनाच्या दिवसाचे सविस्तर नियोजन करण्यात आले. यामध्ये पादुकांचे स्वागत, शहरातून निघणारी शोभायात्रा, भजन, कीर्तन, सामूहिक आरती आणि महाप्रसादाचे आयोजन निश्च