कळमनूरी: मोटार सायकल घेण्यासाठी माहेरहून 80 हजार रुपये घेऊन ये म्हणून आ .बाळापूर येथील विवाहितेस मारहाण करून घराबाहेर हाकलले
कळमनुरी तालुक्यातील आ.बाळापूर येथील विवाहितेस दिपाली दिशांत मुधळ ह .मु . साईनगर आ .बाळापूर हिस सासरच्या मंडळींनी लग्नानंतर दीड वर्षानंतर ते 10 जानेवारी 2025 पर्यंत माहेरून मोटरसायकल साठी 80 हजार रुपये घेऊन ये असे म्हणून तिला वेळोवेळी शारीरिक मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करून मारहाण करून उपाशीपोटी ठेवून घराबाहेर हाकलून दिले,याप्रकरणी आ.बाळापुर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या तिघा जणावर आज दि 5 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.